पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी बैठक

(Last Updated On: September 22, 2020)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवारी कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाºया महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची उच्चस्तरिय बैठक होणार आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.
देशातले ६५ पूर्णांक ५ दशांश टक्के कोविड रुग्ण महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब या सात राज्यांमधे असून देशातले कोरोनामुळे होणारे ७० टक्के मृत्यू याच राज्यात नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, संबंधित सात राज्यांमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसेच राज्यातील वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा बैठकीत घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *