Home प्रादेशिक विदर्भ महावितरणमधील कर्मचाºयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

महावितरणमधील कर्मचाºयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

79

गोंदिया : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीतील नवेगांव बांधच्या अर्जुनी मोरगाव उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ सुनिल गोमन रहांगडाले यांना सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडण्या आले आहे.

सविस्तर असे की, संबंधित तक्रारदार आऱ ओ़ वॉटर प्लान्ट चालवण्याचा व्यवसाय करतात़ यासाठी त्यांनी वेगळे वीज मीटर घेतले आहे. मागील एप्रिल 2020 दरम्यान आऱ ओ. प्लान्टच्या कॉम्प्रेसरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कूलिंग कालावधी वाढला़ त्यामुळे वीज खर्च
जास्त येऊ लागला़ बिलाची कमी आकारणी व्हावी यासाठी तक्रारदाराने कॉम्प्रेसरला थेट मीटरमधून पुरवठा केला होता. 12 सप्टेंबर ़2020 रोजी सुनिल रहांगडाले हे बिल देण्याच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या प्रकल्पात आले असता हा प्रकार त्यांच्या निर्दशनास आला. यावेळी त्यांनी तक्रारदारास वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ मात्र, त्यांनी गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली़ यानंतर पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे ेयांनी अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचला. यानंतर
रहांगडाले यांनी तडजोडीअंती सहा हजारांची लाच रक्कम पंचासमक्ष
स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले़
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार (नागपूर) यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप अधीक्षक रमाकांत कोकाटे, सहाय्यक फौजदार विजय
खोब्रागडे, नापोशि रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन यांनी केली.