Home राजधानी मुंबई मुंबईत मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी

मुंबईत मुसळधार पाऊस, गुडघाभर पाणी

219

मुंबई : मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
माहितीनुसार, हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यासह अनेक जागी गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. सांताक्रुझ, अंधेरीसह पश्चिम उपनगरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.
मुंबईतील आज पहाट मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक स्थानकात पाणी साचल्याने रुळ पाण्याखाली गेले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात येत्या 24 तासात जोरदार पावसांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना आदी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (छायाचित्र : ट्विटर)
——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here