Home साहित्य-संस्कृती काव्यसुमन मोक्ष…Kavya Suman

मोक्ष…Kavya Suman

12

घाम भाळीचा पुसता
श्रमाचा ध्यास घेता
मी वेचत गेलो मज… सर्वकाळ !

रक्तानेच दिले दु:ख
मला अश्वत्थाम्याचे
फुंकत गेलो आरक्त… जखमा किती !

वाटे चेतावा हा देह
राख व्हावी तनाची
मन राहावे हरितगर्भ… चिरंतन !

चुकावे चक्र जननमरणाचे
रायाने आता ध्यानावे
घडावया परमार्थ द्यावा…मज मोक्ष !

संजय मुंदलकर

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here