पांढरकवडा वनक्षेत्रात वाघिणीस जिवंत पकडले

(Last Updated On: September 24, 2020)

पांढरकवडा / मुंबई : पांढरकवडा वनक्षेत्रातील दहशत माजवणाºया वाघिणीला वन विभागाच्या अधिकाºयांनी आज शिताफीने जिवंत पकडले. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचाºयांचे कौतुक केले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी आदेश दिल्यापासून ३६ तासांत तिला पकडल्यामुळे गावकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील परिसरात दहशत माजवलेल्या वाघिणीने मागील दोन महिन्यांत या भागातील माणसे, जनावरे यांच्यावर हल्ले केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: याची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाºयांना या वाघिणीस जिवंत पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे वन विभागाने सापळा लावून तिला पकडले. या वाघिणीला नागपूर येथे अस्थायी उपचार केंद्र्रात हलवण्यात आले आहे.
या वाघिणीचा अंधारवाडी, वासरी, कोपामांडवी, कोब्बई परिसरात संचार होता आणि तिने हल्लेही करावयास सुरुवात केली होती. यामध्ये एक जण जखमी तर एका महिलेचा मृत्यू ओढविला होता.  जनावरेही मारली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीनुसार समितीची एक बैठकही पार पाडण्यात आली होती त्याप्रमाणे पांढरकवडा वन विभागाच्या पथकांनी शोध सुरू केला होता. या परिसरात २९ कॅमेरे देखील लावण्यात आले होते. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी मौजे वासरी येथे सुभाष कायतवारला गंभीर जखमी केले. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी अंधारवाडी येथील लक्ष्मीबाई दडाजे यांच्यावर हल्ला केला, त्यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
मानद वन्यजीवरक्षक डॉ. रमजान विराणी यांनी सादर केलेल्या कॅमेरा फुटेजमध्ये तसेच इतर कॅमेºयात आलेल्या चित्रीकरणात या वाघिणीचा वावर दिसला. अस्वाभाविक वर्तन पाहता तसेच शेतीचा हंगाम असल्याने मानव वन्य जीव संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन वाघिणीस तत्काळ बंदिस्त करण्याची कार्यवाही करण्यास मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी मान्यता दिली, त्याप्रमाणे तिच्यावर पाळत ठेवून बेशुद्ध करून जेरबंद करण्यास पथकांना यश आले. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *