Home प्रादेशिक विदर्भ डॉ. निखिल चांदुरे यांना नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस पदवी

डॉ. निखिल चांदुरे यांना नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस पदवी

500

यवतमाळ : डॉ. निखिल दत्ता चांदुरे यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातून नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एमएस ही पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. निखिल चांदुरे यांनी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि त्यानंतर आॅप्थोमॉलॉजी (नेत्र विज्ञानशास्त्र) शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. डॉ. निखिल हे राज्य कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेले उपविभागीय कृषी अधिकारी दत्ता शामसुंदर चांदोरे यांचे पुत्र आहेत. उच्चविद्याविभूषित चांदोरे परिवारातील कन्या निकिता यांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.