नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

(Last Updated On: September 24, 2020)

मुंबई : राज्यात येत्या १७ ते २५ आॅक्टोबरदरम्यान नवरात्र, दुर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रकारे येणाºया सणांमध्येही सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबविता येईल. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या बाबींची काळजी घ्यावी़ यातूनआपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आगामी सणांबाबत लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *