चार हजार किलो गोवंशीय मांस जप्त

(Last Updated On: September 24, 2020)

नागपूर : युनिट पाचच्या गस्तीवरील पथकाने यशोधरानगर परिसरात अंदाजे चार हजार किलो गोवंशीय मांस (किं. 4 लाख 80 हजार), 24 गोवंशीय जिवंत जनावरे (किं 2 लाख 40 हजार), दोन वाहने (किं.18 लाख) असा एकूण असा 25 लाख 20 हजार 200 रुपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी रेहान खान शब्बीर खान, सुनिल कृष्णा पातोंड यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले असून एका विधिसंघर्षित बालकाला सूचनापत्रावर सोडण्यात आले.
ही कारवाई गजानन राजमाने, पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा
नागपूर शहर, विक्रम साळवी पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 5 यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो.नि. रमाकांत दुर्गे, पोलिस निरीक्षक विनोद पाटील गुन्हे शाखा, सपोनि अनिल मेश्राम, पोउपनि ओमप्रकाश भलावी गुन्हे शाखा, मपोउपनि कु. कुळमेथे गुन्हे
शाखा, पोउपनि श्रीनिवास दराडे, पोउपनि जितेंद्र्र भार्गव,
पो.ह. प्रवीण नखाते, पो.ह. दीपक धानोरकर, पो.ना. विजय लांजेवार, पो.ना. संतोष यादव, पो. ना. गजानन गोसावी,पो. ना. निलेश घायवट, पो.शि. किशोर, पो.ह. सुनिल चौधरी, पो. ह. उमेश खोब्रागडे, पो.ना. रविंद्र राऊत, पो.ना. दिनेश चापलेकर, पो.ना. सुनिल ठवकर, पो.ना. अनिल बावने, पो.शि. उत्कर्ष राऊत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *