फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी राफेल उडवणार

अनुपमा... महिला विश्व

अभिवृत्त न्यूज ब्युरो
मागील काही महिन्यांपासून आपल्या देशात ‘राफेल’ या लढाऊ विमानाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे़ फ्रान्सकडून मिळालेल्या या विमानाचे अशा स्थितीत देशात आगमन झाले, ज्यावेळी शेजारच्या विस्तारवादी देश चीनने भारताविरोधी मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. अतिशय वेगवान अशा राफेलमुळे देशाच्या सुरक्षायंत्रणांचा आत्मविश्वास अधिक वाढल्या दिसून येते.
आता पुन्हा नव्याने राफेलविषयी चर्चा सुरू झाली आहे़ त्याचे कारणही गौरवास्पद असेच आहे़ उत्तर प्रदेशातील वाराणशी येथील फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना राफेलचे उड्डाण करण्याची संधी मिळाली आहे. त्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. त्यांना देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. योगायोग म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.
शिवांगी सिंह पुढील काही दिवसांत हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. सध्या त्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेलचे उड्डाण फारसे आव्हानात्मक नसेल.
यात विशेष असे की, फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यापूर्वी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या़ याठिकाणी त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केले होते. भारतील हवाई दलात10 महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमान उडवण्याचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.
कौटुंबिक वारसा
बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून (बीएचयू) शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली आहे. ते सैन्यात कर्नलपदी होते. शिवांगी यांचे वडिल कुमारेश्वर यांनी सांगितले की, एक दिवसापूर्वीच याबाबत माहिती मिळाली होती़ आमच्या मुलीवर आम्हा सर्वांनाच गर्व आहे़ समाजातील अन्य मुलींसाठीही ती प्रेरणा बनली आहे. आई सीमा सिंह, भाऊ मयंक, मोठे वडिल राजेश्वर सिंह, चुलत भाऊ शुभांशू, हिमांशू यांनी सर्वाधिक आनंद व्यक्त केला आहे. लेकीच्या या सन्मानानंतर सिंह कुटुंबात उत्साहाचे वातावरण तर आहेच़ शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *