Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र ‘पिफ’ महोत्सवासाठी प्रवेशिका आमंत्रित

‘पिफ’ महोत्सवासाठी प्रवेशिका आमंत्रित

276

पुणे : १९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्र्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आल्याचे अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाकडून स्पष्ट केले आहे.
स्पर्धेत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांना सहभागी होता येईल. प्रवेशअर्ज 2 डीव्हीडी किंवा व्हिमीओ लिंक पासवर्डसह पाठवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२० ही आहे. ज्या निर्मात्यांचे चित्रपट डिसेंबर २०२० पर्यंत सेन्सॉर होतील, त्यांनी लिंक किंवा 2 डीव्हीडी आणि प्रवेशअर्ज आधी पाठवून सेंसॉर सर्टिफिकेट ३१ डिसेंम्बर २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पिफ आॅफिस पुणे येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी विशाल शिंदे (मोबाईल क्रमांक 90111 33111) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पदाधिकारी तसेच सर्व संचालक मंडळाने केले आहे.