Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या कार्यालयासाठी नागपुरात जागेची मागणी

चित्रपट महामंडळाच्या कार्यालयासाठी नागपुरात जागेची मागणी

263

पुणे : अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयासाठी नागपुरात जागा उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी नुकतीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली़ यावेळी कलाकारांच्या अडचणी, शासनाच्या कलाकार कल्याण मंडळाची गरज, कलाकारांना पोलिस मदत, नागपूर येथे चित्रपट महामंडळाच्या कार्यालयासाठी जागेची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.