लिपिकाला हजाराची लाच घेताना पकडले

(Last Updated On: September 24, 2020)

गडचिरोली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग क्ऱ एक येथील लिपीक बाबाराव शंकरराव बाहे यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले़.
सविस्तर असे की, सदर प्रकरणातील तक्रारदार हे देसाईगंज जि. गडचिरोली येथील रहिवासी असून शिक्षण घेत आहेत़ त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम उपविभाग (देसाईगंज) येथे मजूर म्हणून कार्यरत असताना सन 2016 मध्ये त्यांना अर्धांगवायूचा आजार झाला होता़ यात त्यांना नागभिड व नागपूर येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले़ तक्रारदाराने आपल्या वडिलांवर केलेल्या औषधोपचाराचे वैद्यकीय कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम उपविभाग (देसाईगंज) येथे सादर केले़ यानिमित्ताने लिपीक बाबाराव शंकरराव बाहे यांची भेट घेतली असता त्यांनी बिलाचे धनादेश तयार करून देण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांच्याकडे तक्रार नोंदवली़़ यानंतर 23 सप्टेंबर 2020 रोजी सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले़
पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर,अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार नागपूर, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनातील कारवाईत पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, स.फौ. मोरेश्वर लाकडे, पो.हवा. प्रमोद ढोरे, नत्थू धोटे, नापोशि सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोशि महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, गणेश वासेकर, तुळशीराम नवघरे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *