Home राजधानी मुंबई प्लाझ्मा बॅगसाठी दर आकारणी निश्चित

प्लाझ्मा बॅगसाठी दर आकारणी निश्चित

65

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रतिडोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मीली) खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून 5 हजार 500 रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रकमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील, अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाºयामार्फत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर नि:शुल्क प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशने आॅफ लेबल प्लाझ्मा थेरपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (आॅफ लेबल) वापरण्यासाठी खासगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.
रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्लाझ्माचा प्रतिडोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली होती. समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या / विशेष चाचण्या यासाठी आकारण्यात येणाºया सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे. त्यानुसार प्लाझ्मा बॅग (२०० मिली) ५,५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. (महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here