Home टपोरी टुरकी ....Jocks for You राधा बस कंडक्टरला…Tapori Turaki

राधा बस कंडक्टरला…Tapori Turaki

83

रश्मी : डॉक्टर, माझा नवरा बंटीनं चुकून पॅन कार्ड गिळलंय… काहीतरी करा पट्कन.
डॉ. कुजके : शांत व्हा, त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा. दोन्ही लिंक झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही.

***

संजयराव घाईघाईनं किचनमध्ये शिरले. अन् विचारलं, संजना आज जेवायला काय केलंय?
संजना : जी…एस…टी…
संजयराव : हे काय नवीन?
संजना : अहो, गवार भाजी, शेंगदाणा चटणी,
आणि टोमॅटो सार…सम्मजलं.
संजयराव : हो ऽऽ हो समजलं सारं…

***
बन्या अन् मन्या पारावर बसले होते. बन्या बोलला, आपल्या सासुरवाडीबद्दल एका वाक्यात सांग बरं!
मन्या : सासुरवाडी हे एकमेव असं ठिकाण आहे, जिथं बायको आपल्याशी कधीच भांडत नाही.

***
बंट्याच्या घरी नागपुरातून एक पाव्हणा आला…
पाहुणा : काय रे,मोठा झाल्यावर काय करशील?
.
बंटी : काहीही करीन…पण कुणाच्या घरी जाऊन असे फालतू प्रश्न बिल्कुल्ल विचारणार नाही.

***

मी बाभुळगांवच्या हॉटेलमध्ये एकटाच बसलो होतो…
एका मुलीने जवळ येऊन विचारलं, तू सिंगल आहेस का? मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, हो…
मग काय राव, माझ्या समोरची रिकामी खुर्ची
घेऊन गेली ना राव तिनं…

***

एक बाई यवत्याच्या बाजारात सोना आजीला पाहून चेकाळली.
बाई : या वयात सुद्धा कपाळावर टिकली …म्हणजे नशिबवान आहात की आजी.
मग आमची सोना आजीनं तिला टरकावलीच,
अगं बाई ‘टकल्या’ टिकला म्हणून टिकली बी ‘टिकली’.

***
राधा बस कंडक्टरला विचारते, हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंडक्टर : कचरा भरू द्या की, निघू लगेच!
कारण, राव कंडक्टर भिवापुरी मिरचीचा ठेचा खाणारा होता…

***

दोन मित्रांच्या गप्पा…
पहिला : एक गोष्ट लक्षात येत नाही…
ुदुसरा : कोणती रे?
पहिला : दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल? नाल्याजवळ असो, दक्षिण दिशेला तोंड असो, समोर खड्डा, झाड किंवा..
लाईटचा ट्रान्सफॉर्मर असो़़़़
दुसरा : हं…
पहिला : किंवा आणखी काही वास्तुदोष असो,
दुकानात गर्दी नेहमीच असतेच, असते…

*****