Home BREAKING NEWS राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान

राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान

204

मुंबई : विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अमिट ठसा उमटवणाºया महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर, न्यायवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे, विमानचालन क्षेत्रातील उद्योजिका लीना जुवेकर – दत्तगुप्ता, डॉ. उज्वला जाधव व बेलिन्डा परेरा (समाजकार्य) व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका शिबानी जोशी यांना प्रशस्तीपत्र व भगवद्गीतेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. प्रिया सावंत यांच्या ‘लीडिंग लेडी फाउंडेशन’च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मातृशक्तीचा सन्मान करणे हे आपले सौभाग्य असल्याचे सांगून महाराष्ट्रात महिला विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा मराठी वृत्तपत्रांमध्ये महिला स्तंभलेखिका मोठ्या प्रमाणात लिखाण करीत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

मराठी काव्यपंक्ती, सुभाषिते वापरावी
महाराष्ट्रातील खासदार संसदेत आवर्जून हिंदी भाषेत बोलतात. भाषणात ते उर्दू शेरोशायरी किंवा हिन्दी कवितांचा उल्लेख करतात याबरोबरच त्यांनी मराठी भाषेत विपुल काव्यभांडार, सुंदर काव्यपंक्ती व सुभाषिते यांचाही उल्लेख करावा. मराठी भाषेतील प्रेरणादायी विचार व काव्यपंक्तींचे पुस्तक असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समर्थ रामदासांचा ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ हा श्लोक आपणांस आवडल्याने तो पाठ करून ठेवला, लीला गोळे यांची ‘आनंदवन भुवनी’ ही कादंबरी वाचल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान महिलांना यशाचा कानमंत्र सांगणारे प्रिया सावंत यांनी लिहिलेले ‘गोल्डन सक्सेस स्किल्स’या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here