Home उपराजधानी नागपूर महसूल कर्मचारी संघटनाचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

महसूल कर्मचारी संघटनाचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

289

नागपूर : जिल्हा महसूल कर्मचारी संघटना नागपूरतर्फे शुक्रवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च भागविण्यासाठी तातडीने योजना राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदोडकर, उपाध्यक्ष दिनेश तिजारे, सरचिटणीस राज ढोमणे, उपाध्यक्ष (महिला) रसिका धात्रक-झंझाळ, ताराचंद कावडकर, सतिश सुर्यवंशी, श्रीमती रखसाना शेख, शैलेश चरडे आदी उपस्थित होते.