दिव्यांग अधिकारी, कर्मचाºयांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

(Last Updated On: September 26, 2020)

मुंबई : कोरोना काळात २१ एप्रिल २०२० आणि ११ जून २०२० च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये १०० टक्के अधिकाºयांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. अशा कार्यालयातसुद्धा दिव्यांग अधिकारी, कर्मचाºयांना उपस्थितीत सूट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमकुवत असते़ तसेच, वाहतुकीच्या सोयीसुविधांचा विचार करून लॉकडाऊनच्या काळातदेखील काही कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने उपस्थितीचे प्रमाण वाढवले जात असताना दिव्यांग कर्मचाºयांना २१ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता. पुढील काळात अनलॉकच्या टप्प्यांमध्ये कर्मचारी उपस्थितीची टक्केवारी काही मर्यादेत वाढविण्यात आली.
काही कार्यलयांमध्ये आता अधिकारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य करण्यात आली आहे; परंतु वाहतुकीच्या सुविधा मात्र आणखी पूर्णपणे सुरळीत नाहीत. या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या कार्यालयांमध्येही दिव्यांग व्यक्तींना उपस्थितीतून सूट मिळवून दिल्याने दिव्यांग अधिकारी / कर्मचारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिकारी – कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होणार नाही,याबाबतची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *