Home राष्ट्रीय बिहार विधानसभेची तीन टप्प्यात निवडणूक

बिहार विधानसभेची तीन टप्प्यात निवडणूक

329

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूकीसाठीची आदर्श आचारसंहिता २५ सप्टेंबरपासून लागू झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्लीत याबाबत माहिती दिली. पहिल्या टप्प्यात २८ आॅक्टोबरला ७१ जागांसाठी, दुसºया टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी आणि ७ नोव्हेंबरला तिसºया टप्प्यात ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच, मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने सुरक्षित मतदानासाठी काही ठोस उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार मतदानाची वेळ एक तासाने वाढवत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे. शेवटचा तास कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे. निवडणुकीसंदर्भात समाज माध्यमांवर गैरवर्तन करणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्य आयुक्त अरोरा यांनी स्पष्ट केले.