Home BREAKING NEWS कोळसा खाणीत 17 जणांचा मृत्यू

कोळसा खाणीत 17 जणांचा मृत्यू

72

बीजिंग, 27 सप्टेंबर : दक्षिण-पश्चिम चीनमधील कोळशाच्या खाणीत रविवारी कार्बन मोनोआॅक्साइडच्या पातळीत वाढ झाल्याने 17 जणांचा मृत्यू झाला. वरिष्ठ शासकीय अधिकाºयांनी याबाबत माहिती दिली.
वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, किजियांग जिल्ह्यातील संबंधित खाण स्थानिक ऊर्जा कंपनीशी संबंधित असून याठिकाणी बेल्ट जाळण्यात आला होता़ त्यामुळे कार्बन मोनोआॅक्साइडची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. परिणामी त्याठिकाणी कार्यरत 17 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. अद्यापही घटनास्थळी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अन्य एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच 75 सदस्यांचा समावेश असलेल्या बचावपथकाने 30 आरोग्य कर्मचाºयांसह खाणीत प्रवेश केला़ आणि मदतकार्य सुरू केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here