Home BREAKING NEWS नम्रता,निष्काम सेवा हेच खरे मोती…SAAY pasaaydan

नम्रता,निष्काम सेवा हेच खरे मोती…SAAY pasaaydan

77

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

नम्रता असा अनमोल सद्गुण आहे, ज्याला आपल्या जीवनात धारण केले पाहिजे. नम्रतेचा खरा अर्थ आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, या भावनेने जगणे. ज्यावेळी आपल्याला जाणीव होते की आपण सर्व परमेश्वराला एकसमान आहोत, तेव्हा आपल्या वागण्यात नम्रता येते. जेव्हा आपला अहंकार नष्ट होतो, तेव्हा आपल्यातील अहंकाराबरोबर
गर्व देखील नाश पावतो. म्हणून आपण कुणालाही ही दुखवता कामा नये. आपल्याला याची जाणीव होते की परमेश्वराच्या कृपेने काही गोष्टी प्राप्त झाल्या आहेत आणि ज्या काही गोष्टी आपल्याला दुसºयापासून वेगळे करतात, हे देखील परमेश्वराने दिलेले बक्षीस आहे.
आपल्यामध्ये परमेश्वराच्या प्रेमाची जाणीव झाल्याने आपल्यात नम्रता येते. तेव्हा आपल्याला अनुभव येत असतो की या गोष्टीचा करता करविता परमेश्वरच आहे. तेव्हा आपल्यामध्ये आंतरिक नम्रतेचा विकास होतो. त्यावेळी आपला पैसा, धन-दौलत, मान-प्रतिष्ठा, ज्ञान आणि अभिमान रहात नाही. असे म्हटले जाते की जिथे प्रेम आहे, तेथे नम्रता असते. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यापुढे आपली मान बढाई करीत नसतो. तसेच, आपण त्यांच्यावर रागावत नाही.
आपल्याला त्या लोकांच्या बाबतीतही असाच व्यवहार केला पाहिजे, ज्यांना आपण ओळखत नाही. असे देखील म्हटले जाते की जिथे प्रेम आहे, तिथे नि:स्वार्थ सेवेचा भाव असतो. तसेच, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आणि ज्यांना मदत करू इच्छितो; परंतु जे पण कुणी आपल्याला भेटतील त्याची सुद्धा आपण मदत केली पाहिजे. कारण आपल्या सर्वांच्या अंतरी प्रभूची ज्योती विद्यमान आहे.
आपल्या अंतरी नम्रता विकसित करण्याचा एक मार्ग आहे. तो म्हणजे ध्यान-अभ्यास. जेव्हा आपण आंतरिक ज्योती व शब्दाशी जोडले जातो. तेव्हा आपल्यात प्रेम, नम्रता व शांतीचा प्रवाह सुरू होतो. आपण दुसºयांची नि:स्वार्थ सेवा करतो, जेणेकरून त्याचे दु:ख व यातना कमी होतील. जीवनाच्या वादळात आपण दीपस्तंभ बनतो. महासागरात एखादे जहाज किंवा नाव मार्ग भटकते तेव्हा ते नेहमी दीपस्तंभाकडे पाहतात. केवळ एकदा जरी प्रभूच्या ज्योतीच्या दर्शनाचा अनुभव झाला तर आपल्यात विश्वास निर्माण होतो की आपण प्रभूचे अंश आहोत. आपण एक आदर्श मानवाचे प्रतीक होऊन, प्रकाशस्तंभाप्रमाणे दुसºयाची मदत करतो, त्यांना मार्ग दाखवितो. आपण प्रभू प्रेमात असतो, तेव्हा आपल्या जीवनात स्थैर्य येते आणि आपण ध्यान-अभ्यासात असतो, त्यावेळी समाधान आणि परमानंद आपल्याला प्राप्त होतो. तो केवळ त्या वेळेपुरता नसतो तर त्यानंतरही ही आपल्याबरोबर सदैव कायम असतो याचा आपल्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक देखील आपल्यापासून दूर राहू शकत नाहीत, ते आपल्याशी जोडले जातात.

*****