Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य पंचमदा माहितीये…CINEdeep

पंचमदा माहितीये…CINEdeep

123

 पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन किंवा राहुल बर्मन अशा नावांनी भारतीय संगीतक्षेत्रात ओळखले जाणारे महान संगीतकार. त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी आपल्या रसिकांवर उधळून लावली आणि भारतीय रसिकही तितक्याच उत्कंठेने तृप्त झाले.
भारतीय रसिक हा पूर्वापारच संगीताचा भोक्ता. संगीत कोणत्याही प्रकारातील असो, त्याला गोडव्याने ऐकले, तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद दिला आणि उंच शिखरावर पोहोचवले. भारतीय संगीत उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यात जसा रसिकाचा सहभाग आहे, तितकाच तो गीतकाराचा आणि संगीतकाराच्या श्रमाचा, साधनेचा, तल्लीनतेचा परिपाक आहे.
पंचमदांच्या कारकिर्दीतील अनेक गाण्यांपैकी एक म्हणजे तेरे बना ़िंजदगी से कोई शिकवा तो नहीं… (आँधी) हे होय. आर. डी. बर्मन यांचे हे अतिशय रोमँटिक गाणे आहे. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित या गाण्याला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा स्वर आहे. घर आजा घर आई बदरिया सावरिया…(चित्रपट: छोटे नवाब) लता दीदी मंगेशकर यांनी गायिलेले गाणे शैलेंद्र यांनी लिहिले आहे. ‘चुनरी संभाल गोरी…’ (चित्रपट : बहारों के सपने)
भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करण्याचे श्रेय पंचमदांना दिले जाते. मात्र, त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारतीय लोक संगीतालाही उत्तमप्रकारे सामावून घेतले आहे. यात त्यांनी बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केला आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले गाणे मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायिले आहे. पल दो पल का साथ हमारा…(द बर्निंग ट्रेन) धावत्या रेल्वेगाडीतील ही कव्वाली सर्वांचीच आवडती आहे. रोमांचक अशा मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी ही कव्वाली गायिली आहे.
पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अमरप्रेम’ या चित्रपटातील रैना बीती जाए…हे गाणे लता मंगेशकर यांनी गायिले आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत आपण देऊ शकतो हे पंचमदांनी यातून सिद्ध केले आहे. अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी (किताब) या गाण्याचे गीतकार गुलजार आहेत आणि गायिका आहेत पद्मिनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे(श्रद्धा कपूरची आई). त्यावेळी दोघीही अगदी लहान होत्या. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना…(अमरप्रेम) आनंद बक्षींच्या शब्दांना पंचम यांनी सुंदर संगीत साज दिला . किशोरकुमार यांच्या आवाजामुळे त्याला वेगळी उंची मिळाली आहे. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है (इजाजत) गुलजार यांच्या शब्दांना सुंदर चाल लावली आहे. आशा भोसले यांचा आवाज तर लाजवाब.
हरे रामा हरे कृष्णामधील दम मारो दम या गाण्यात पंचमदा यांनी तरुणवर्गाला चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व दिले आहे. ७० च्या दशकातील खुलेपणा या गाण्यात वापरला आहे. त्या काळात तरुण वर्गामध्ये होत असलेले बदल गाण्यात चित्रित केल्याचे दिसून येते. या गाण्याचे शब्द आनंद बक्षी यांचे आहेत. इजाजतमधील अन्य एक गीत ‘कतरा कतरा…’ गुलजार यांनीच लिहिले आहे. हे गाणं पंचमदांनी दोन वेगवेगळ्या ट्रॅक्सवर वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येते. हे दोन्ही ट्रॅक्स इतक्या बेमालूमरित्या एकमेकांमध्ये मिसळले आहेत, की संपूर्ण गीत एक स्वतंत्र भासते.

*****