आदिवासी भागात गरोदर महिला, बालकांना मोफत दूध भुकटी मिळणार

(Last Updated On: September 29, 2020)

मुंबई : राज्यातील आदिवासी भागातील सुमारे 1 लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना आणि 6 लाख 51 हजार बालकांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत भुकटीचे वाटप होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानंदमार्फत उत्पादित होणारी ही अतिरिक्त दूध भुकटीचा वापर आदिवासी भागातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बालकांना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघांने (महानंद) अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे. दूध भुकटीचे वितरण करण्याची ठिकाणे कळवण्यासंदर्भात महानंदने आदिवासी विकास विभागास कळविले आहे.
राज्यातील 16 जिल्ह्यातील आदिवासी भागातील 1 लाख 21 हजार स्तनदा माता व गरोदर महिलांना प्रतिदिन 25 ग्रॅम आणि 6 लाख 51 हजार बालकांना प्रतिदिन 18 ग्रॅम दूध भुकटीचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी एक वर्षासाठी सुमारे 5,750 मेट्रिक टन दूध भुकटी लागणार आहे. ही संपूर्ण योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत (महानंद) एक वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. (महासंवाद)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *