Home राजधानी मुंबई सोयाबीन खरेदीची नोंदणी येत्या गुरुवारपासून

सोयाबीन खरेदीची नोंदणी येत्या गुरुवारपासून

79

मुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन पिकाच्या खरेदीसाठीची नोंदणी १ आॅक्टोबरपासून सुरू होणार असून खरेदी १५ आॅक्टोबर २०२० पासून प्रारंभ होईल. शेतकºयांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
केंद्र शासनाने प्रतिक्विंटल सोयाबीनसाठी हमी भाव ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र्र १ आॅक्टोबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आपापल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा सादर करून मोबाईल खरेदी केंद्रावर नोंदवण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय उडीद पिकाची खरेदी १ आॅक्टोबरपासून सुरू होत असून, १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. (महासंवाद)