फरार महिला आरोपीला अटक

(Last Updated On: September 30, 2020)

नागपूर : दारूबंदी कायद्यासंबंधी गुन्ह्यातील पाहिजे असलेली महिला आरोपी चंदाबाई
प्रदीप ठाकुर हिला मंगळवारी अटक करण्यात आली.
सूत्रानुसार, इतवारी रेल्वेस्टेशन परिसरात वास्तव्यास असलेली चंदाबाई
प्रदीप ठाकुर (वय 50) ही कळमना हद्दीत जुना कामठी रोड येथे किरण सैफुल यांचे घराजवळ लपून राहत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना मिळाली होती. त्यावरून सपोनि योगेश चौधरी यांनी आपले सहकारी पोहवा. अरुण धर्र्मे, नापोशि टप्पुलाल
चुटे, पोशि सत्येन्द्र यादव, मपोशि भावना साकोरे यांच्यासह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी सदर महिला आरोपी घरात लपून होती आणि बाहेरून
कुलूप लावून कुणीही राहत नसल्याचे भासवत असल्याचे आढळून आले. तिला आवाज देवूनही ती बाहेर न आल्याने समोरील दाराला लावलेले कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी चंदाबाई प्रदीप ठाकुर हिला ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. दरम्यान, पुढील कार्यवाहीस्तव आरोपीला अंमली पदार्थविरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी, उपायुक्त (डिटेक्शन) गजानन राजमाने, सपोआ सुधीर नंदनवार (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सपोनि योगेश चौधरी, पोहवा. अरुण धर्र्मे, नापोशि टप्पुलाल चुटे, पोशि सत्येन्द्र यादव, मपोशि भावना साकोरे, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *