Home मुंबई अंगणवाडी कर्मचारी कौतुकास पात्र : यशोमती ठाकूर

अंगणवाडी कर्मचारी कौतुकास पात्र : यशोमती ठाकूर

26

मुंबई : ‘अंगणवाडी तार्इं’ नी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या ‘कोविड योद्धा’ आहेत, त्यांना योग्य सन्मान, प्रोत्साहन मिळेल, असे उपक्रम विभागाकडून राबविले जातील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. युनिसेफच्या श्रीमती राजलक्ष्मी नायर व श्रीमती अल्पा व्होरा यांनी आज मंत्री अ‍ॅड. ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात नियोजित कार्यक्रमांबाबत चर्चा झाली.

कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षण, पोषण आहार यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्याशी झूम कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातील. बंद झालेल्या लोकाभिमुख योजना पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात येईल, असे अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

बालविवाह ही चिंतेची बाब बनली आहे. बालविवाहांना आळा घालण्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रबोधन आणि इतर उपाययोजनांच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येईल. १८ व्या वर्षी अनाथगृहातून बाहेर पडणाणाºया मुलांच्या भविष्याकरिता ठोस कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य, आदिवासी विकास, शिक्षण, गृह अशा शासनाच्या विविध विभागांचा समन्वय साधत महिला व बालकांच्या विकासासाठी आराखडा (रोडमॅप) युनिसेफकडून तयार करण्यात येणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. (महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here