Home राजधानी मुंबई रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी

रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी

45
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : शासनाने राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास अखेर परवानगी दिली असून येत्या ५ आॅक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आज अनलॉक-5 चे नियम घोषित केले आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यापासून रेस्टॉरंट आणि बार बंद आहेत.
रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना नियम आणि अटी पर्यटन विभागाच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, शाळा-महाविद्यालये ३१ आॅक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. चित्रपटगृहे, सार्वजनिक पोहण्याची स्थळे (स्वीमिंग पूल) देखील बंदच राहणार आहे. मागील काही दिवसांपासून धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी होत आहे. मात्र, अनलॉक 5 मध्ये त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here