Home उपराजधानी नागपूर कामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या

कामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या

78

नागपूर : विद्यापीठ कर्मचारी व अधिकाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे १ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया आॅनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.
विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र पोहोचू शकले नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्राचार्य फोरमनेदेखील केली होती. विद्यापीठाच्या आॅनलाईन परीक्षेसाठी दोन दिवसांआधी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करून ते महाविद्यालयांना पाठविले होते. मात्र, आंदोलनामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य होणार नसल्याचे विद्यापीठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.