वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई

राजधानी मुंबई विदर्भ

वर्धा / मुंबई : वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट [ wardha dryport] उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली येथील ड्रायपोर्टसाठी जागा निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच जेएनपीटीच्या अधिकाºयांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
आज मंत्रालयात राज्यातील चार ड्रायपोर्टचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, जेएनपीटीचे मुख्य अभियंता एस. व्ही. मधभावी उपस्थित होते.
मराठवाड्यातील उद्योगक्षेत्राला गती मिळण्यासाठी जालना येथील, तर वर्धा येथील ड्रायपोर्टमुळे विदर्भातील औद्योगिकरणाला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री देसाई यांनी व्यक्त केला. यासोबत नाशिक व सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी दिले.
राज्याच्या विविध भागातील उत्पादित मालाला देश-विदेशात बाजारपेठ मिळावी, मालाची जलदगतीने आयात-निर्यात व्हावी यासाठी वर्धा, जालना, नाशिक तसेच सांगली येथे ड्रायपोर्ट विकसित केले जात आहे. जालना, वर्धा येथील ड्रायपोर्टचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *