Home राष्ट्रीय बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती

बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती

80

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
बिहार विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा झाली असून विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, बी.एल.संतोष यांच्यासह बिहारमधील प्रमुख भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी फडणवीस यांची नियुक्ती घोषित करण्यात आली.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवून यश मिळवू.