नागपूर : शहरात कोराना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच प्रसार झपाट्याने वाढत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व
पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेमार्फत आज विनामास्क फिरणाºया व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
माहितीनुसार, आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिस ठाण्याअंतर्गत 38 प्रकरणांमध्ये 15 हजार 900 रुपये तर वाहतूक पोलिस विभागाकडून 165 प्रकरणात 77 हजार 100 रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आले. याशिवाय सुरक्षित सामाजिक अंतर नियमाचे पालन न केल्याच्या 60 प्रकरणांत एकूण 6 हजार 800 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
सदर करण्यात आलेली कारवाई ही एका दिवसातील सर्वोच्च अशी कारवाई आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वाहतूक करताना किंवा वावरताना तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवावे. तसेच, पोलिस विभागाला सहकार्य करून स्वत:वरील संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.