फॅ न्सी नंबरप्लेट, डार्क फिल्म प्रकरणात धडक कारवाई

उपराजधानी नागपूर

नागपूर : वाहतूक पोलिसांच्या वतीने बुलेट वाहनात बदल, फॅ न्सी नंबरप्लेट आणि डार्क फिल्म प्रकरणात धडक कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे़ आज गुरुवारी शहरातील एकूण 10 वाहतूक क्षेत्रात 1 हजार 703 इतकी प्रकरणे नोंदवण्यात आली.
शहर आणि शेजारच्या भागात बुलेट वाहनाच्या सायलेन्सर आवाजात तसेच हाँर्नच्या आवाजात बदल करण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहनधारक तसेच पादचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, आज वाहनात बदल, फॅ न्सी नंबरप्लेट आणि डार्क फिल्म प्रकरणात सर्वात जास्त कारवाई (286 प्रकरणे) कामठी वाहतूक क्षेत्रात करण्यात आली. त्यानंतर बर्डीमध्ये 233, अजनीमध्ये 232 आणि कॉटन मार्केट झोनमध्ये 207 प्रकरणे नोंदवण्यात आली. सर्वांत कमी सोनेगांव वाहतूक क्षेत्रात 81 इतकी प्रकरणे नोंदल्या गेली. यात यात सर्वात जास्त डार्क फिल्मसंबंधी (119) असल्याचे दिसून आले.
काल 30 सप्टेंबरला एकूण 304 प्रकरणे नोंदवण्यात आली. यात सर्वात जास्त डार्क फिल्मसंबंधी (207) होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *