Home टपोरी टुरकी तुमने मुझे कुत्ता समझ रखा है क्या… Tapori Turaki

तुमने मुझे कुत्ता समझ रखा है क्या… Tapori Turaki

29

बन्या : काल मला १० जणांनी खूप मारलं.
संज्या : मग तू काय केलंस?
बन्या : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर
एक-एक जण या…
संज्या : मग?
बन्या : मग काय, साल्यांनी एकेकानं येऊन
परत मारलं…

***
व्याकरणाचा वर्ग…
मास्तर: त्याने भांडी घासली. त्याला भांडी घासावी लागली. या दोन वाक्यात काय फरक आहे?
बन्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि दुसºया वाक्यात कर्ता विवाहित आहे.

***
पोलिस : काय रे कुठं चाललाय एवढ्या रात्री?
दारुडा : प्रवचन ऐकायला…
पोलिस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
दारुडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम…
पोलिस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन?
दारुडा : माझी बायको…

***

एक बार पति-पत्नी में झगडा हो रहा था.
पति (चीखकर): तुमने मुझे कुत्ता समझ रखा है
क्या?
पत्नी : बिलकुल नहीं, लेकिन भगवान के लिए
भौकना तो बंद कर दो…

***
एकाने लहान मुलाला विचारलं, कोणत्या शाळेत जातोस?
तो म्हणाला, मी जात नाही!….मला पाठवतात…

***
बंड्याचा वर्ग…
गुरूजी : एक दिवस असा येईल, पृथ्वीवर अजिबात पाणी नसेल. सगळे जीवजंतू नष्ट होवून जातील
बंड्या : गुरूजी, त्यादिवशी शाळेत येवू की नको तेवढं फक्त सांगा. पाण्याचं पाहून घेऊ.

***
विज्ञानाचा वर्ग सुरू होता.
गुरुजी : मन्या सांग बरं, आपल्या देशात इलेक्ट्रिक वायर अधिक उंचीवर का असतात?
मन्या : कारण भारतातील बायकांनी त्यावर कपडे वाळत घालू नये.

***
शिºयानं कर्जावर कार विकत घेतली़
त्याला कर्ज फेडणं जमलं नाही, म्हणून
कंपनीवाले त्याची कार उचलून घेऊन गेले़ तेव्हा शिºया मनात म्हणाला, आयला लग्न पण कर्ज घेऊन केलं पाहिजे होतं.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here