Home राजधानी मुंबई रोजगार गेल्याने मानसिक ताणातून बाहेर येणे आव्हानात्मक : आरोग्यमंत्री

रोजगार गेल्याने मानसिक ताणातून बाहेर येणे आव्हानात्मक : आरोग्यमंत्री

288

मुंबई : कोविड-१९ मुळे अनेकांचा रोजगार गेला असून त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यातून बाहेर पडणे हे एक आव्हान असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले आहे.
ते सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
लोकांवर भार पडू नये यासाठी राज्य सरकारच्या वतीने आरोग्य सेवांचे शुल्क कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचे मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले. अनेक खासगी संस्था लोकांकडून अतिरिकत शुल्क वसूल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी हे विधान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here