Home राष्ट्रीय चार महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

चार महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

105
file photo

नवी दिल्ली : मोसमी पावसाच्या मागील चार महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के पाऊस पडला. इतर तिन्ही महिन्यात सरासरी १०९ टक्के पाऊस पडला, जूनमध्ये १०७, आॅगस्टमध्ये १२७ तर सप्टेंबरमध्ये १०५ टक्के पावसाची नोंद झाली
१९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यंदा सरासरी इतका पाऊस पडला. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरो, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. लडाखमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली.
चांगल्या पावसामुळे शेतकरी समाधानी असून यंदा ११ कोटी १६ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.