Home राजधानी मुंबई शेतकºयांच्या डोळ्यांतील अश्रूंची जाणीव बाळगावी : नाना पटोले

शेतकºयांच्या डोळ्यांतील अश्रूंची जाणीव बाळगावी : नाना पटोले

79

मुंबई : शेतकºयांच्या डोळ्यांतील अश्रूंची आणि त्यांनी घाम गाळून केलेल्या कष्टाची जाणीव बाळगावी, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्र्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी धान उत्पादकांना दिलासा देण्यासंदर्भात मुद्देनिहाय चर्चा झाली.
धानखरेदीसंदर्भात शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. बारदाणांच्या उपलब्धतेअभावी धानखरेदी विस्कळीत होणार नाही, यादृष्टीने सर्व आवश्यक निर्णय त्वरित घेण्यात यावेत. ज्या राज्यांमध्ये धानखरेदीची प्रक्रिया सुलभ आहे, त्याचा अभ्यास करून त्याच धर्तीवर पुढील वर्षी आपल्या राज्यातही तशा खरेदी पद्धतीची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत.
तसेच, धानखरेदी प्रक्रिया सुयोग्यरित्या पार पाडावी यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना, मागील हंगामात धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर कारवाई, चुकाºयाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करणे याबाबींवर चर्चा पार पडली.
धानखरेदी वेळेत न झाल्यास पावसामुळे व अन्य कारणामुळे नुकसान सोसावे लागते. यावर्षीच्या  खरेदी केंद्र्रांवर गर्दी होऊ नये, खरेदी-भरडई-गोदामात माल भरणे हे चक्र योग्यप्रकारे सुरू रहावे, शेतकºयांना एसएमएसद्वारे खरेदी तारीख कळवणे आदी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. बारदाणाचा तुटवडा असल्यास पी.पी. बॅगच्या पर्यायाचाही वापर करण्याबाबत निश्चित करण्यात आले. धान खरेदी योजना राबवताना शेतकºयांचे हित प्राधान्याने जपले जाईल याची योजनेच्या यंत्रणेतील अधिकाºयांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
बैठकीत अन्न व नागरी विभागाचे सचिव विलास पाटील, वित्त (व्यय) विभागाचे सचिव राजीव मित्तल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह सचिव एम. एम. सूर्यवंशी, मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक प्रसाद ओक, व्यवस्थापकीय संचालक दिलीप हळदे, नाफेडचे शाखा व्यवस्थापक पुनीत सिंग,आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक जे. एस. राठोड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.