Home ब्लॉग विकासाचा ‘अटल बोगदा’… ATAL TUNNEL

विकासाचा ‘अटल बोगदा’… ATAL TUNNEL

72

रस्ते, पूल, इमारती, नदी, धरणे, वृक्ष, वन्यजीव या सर्वांना कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया समजण्यात येते. यापैकी काही निसर्गनिर्मित तर काही मानवनिर्मित; परंतु मानवी समाजाच्या सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागत असतो़.
ज्याप्रमाणे दोन मने जोडली (जुळली) जातात, त्यावेळी ती एकसंघ होतात आणि त्यातूनच विचारांची (अर्थात विकासाची) देवाण घेवाण होते़ हाच नियम येथे लागू होतो. दोन शहरे, दोन महत्त्वाची ठिकाणे, दोन राज्यांच्या सीमा़़़या सर्वांना जोडाचे असेल तर ‘रस्ता’ हा हवाच. सुरुवातीला तो कच्चा असेल, त्यात खाचखळगेही असतील; परंतु पुढील काही दिवसांत तो पक्का बनेल, मजबूत बनेल़ त्याची रुंदी वाढेल, कक्षा वाढेल आणि क्षमताही वाढेल़ (कारण त्यावर पूल असतील, बोगदे असतील शिवाय जोडरस्तेही असतील.) काही काळानंतर तो रस्ता दोन पदरी, चार पदरी आणि सहा पदरीही होईल. म्हणजेच विकासाला गती मिळेल. कारण रस्ता म्हणजे वाहतूक म्हणजेच विकास, हे साधे सरळ समीकरण.
असाच उत्तर भारतातील ‘अटल बोगदा’… [ ATAL TUNNEL ] रोहतांग खिंडीच्या खालून बोगदा काढण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 3 जून 2000 रोजी घेतला होता. त्यानंतर 26 मे 2002 रोजी बोगद्याच्या दक्षिणेकडील तोंडाकडे जाणाºया रस्त्याची पायाभरणी झाली होती. हा बोगदा 9.02 किलोमीटरचा असून, जगातील महामार्गांवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा मानला जात आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीवर (10 हजार फूट) हिमालयातील पिर पंजाल पर्वतरांगांमध्ये अल्ट्रा मॉडर्न पद्धतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. यात मनाली आणि लाहौल स्पिती शहरे जोडली जाणार असून, वर्षभर हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असेल. दरवर्षी सहा महिने होण्याºया बर्फाच्या पावसामुळे लाहौल स्पिती खोºयाचा देशाच्या अन्य भागाशी संपर्क तुटलेला असायचा.

प्रमुख वैशिष्ट्ये
* आपत्कालीन संपर्कासाठी प्रत्येक 150 मीटर अंतरावर टेलीफोन सुविधा
* प्रत्येक 60 मीटर अंतरावर ‘फायर हाईड्रंट सिस्टम’
* प्रत्येक 250 मीटर अंतरावर सीसीटीव्ही
कॅ मेरायुक्त कोणत्याही घटनेचा शोध लावणारी यंत्रणा
* प्रत्येक किलोमीटर अंतरावर एयर क्वालिटी गुणवत्तेची चाचणी
* प्रत्येक 25 मीटरवर उजेडाची व्यवस्था
* प्रत्येक 60 मीटर अंतरावर कॅ मेराची सुविधा

बोगदा असा…
बोगद्याचे दक्षिणेकडील तोंड मनालीपासून 25 किलोमीटर अंतरावर 3060 मीटर उंचीवर, तर उत्तर दिशेकडील तोंड 3071 मीटर उंचीवर असलेल्या लाहौल स्पितीतील सिसूजवळच्या तेलिंग नावाच्या गावाजवळ आहे. हा दुहेरी वाहतुकीचा बोगदा असून घोड्याच्या नालच्या आकाराचा आहे. यात 8 मीटरचा ‘रोड वे’ आहे. तसेच, बोगद्याचा क्लिअरन्स 5.525 मीटर आहे. दररोज तीन हजार कार आणि 1,500 ट्रक अशी वाहने सुमारे 80 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने प्रवास करू शकतील.
दरम्यान, उद्या 3 आॅक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल बोगद्या’चे देशार्पण होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सन्मान प्रदान करण्यासाठी रोहतांग बोगद्याचे नामकरण ‘अटल बोगदा’ असे करण्याचा निर्णय घेतला होता. (छायाचित्र साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here