वर्धा : गांधी विचारधारेचा अंगिकार करणाºया आणि सेवाग्रामला नतमस्तक होण्यासाठी येणाºया अभ्यासक आणि पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. वाहनांच्या स्क्रॅपचा वापर करून जगातील पहिले असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे अनुक्रमे 31 आणि 19 फूट उंचीचे स्कल्पचर उभारण्यात आले आहेत. याठिकाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोरोना काळातही सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.
येथील बेरोजगारांनी स्वयंरोजगाराची कास धरावी, यासाठी एम. गिरी या संस्थेत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडे पाठवला असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पालकमंत्री केदार यांनी केली.