महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कार

(Last Updated On: October 3, 2020)

मुंबई  : ग्रामीण भागात केलेल्या स्वच्छता विषयक उल्लेखनीय कायार्साठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते म. गांधी जयंती महाराष्ट्राला एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राज्य पातळीवरील दोन, जिल्हा श्रेणीत जळगाव तर ग्रामपंचायत श्रेणीत यवतमाळ व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ही चमकदार कामगिरी बजावली आहे.
महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत दिनाचे औचित्य साधून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण स्वच्छताविषयक विशेष कामगिरीबद्दल ‘स्वच्छता दिवस पुरस्कार २०२०’ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्याच्यावतीने अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सह सचिव व प्रकल्प संचालक अभय महाजन, राज्यातील सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्राला दुसºया क्रमांकाचा पुरस्कार
जलशक्ती मंत्रालयाने १५ जून ते १५ सप्टेंबर २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ‘सामुदायिक शौचालय अभियान’अंतर्गत ग्रामीण भारत सुरक्षित शौचालय निर्माणासाठी राज्याला देशात दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याने केलेल्या कामगिरीमुळे विशेष म्हणजे जुलै ते सप्टेंबर या लॉकडाऊन काळात राबविलेल्या उपक्रमामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
गंदगीमुक्त अभियानात राज्य तिसरे
यावर्षी ९ ते १५ आॅगस्टदरम्यान केंद्र सरकारने ‘गंदगीमुक्त भारतअभियान’ राबविले. यामध्ये राज्याला श्रमदान प्रकारात तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामुदायिक शौचालय अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्याला देशात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानात भंडारा जिल्ह्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीस राष्ट्रीय स्तरावर दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामुदायिक शौचालय अभियानामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बोरी खुर्द या ग्रामपंचायतीस देशात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
राज्यात कोविड-19 च्या प्रादुभार्वाची परिस्थिती असतानाही ग्रामीण जनतेसाठी अहोरात्र काम करून पुरस्कार मिळवून देणाºया सर्व स्वच्छता कार्यकर्त्यांचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *