Home BREAKING NEWS दीपस्तंभ धर्मदायीतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

दीपस्तंभ धर्मदायीतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

76

नागपूर : दीपस्तंभ धर्मदायी संस्था आणि रोटरी क्लब आॅफ नागपूर विजन यांच्या वतीने १० उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील १० विद्यार्थ्यांना दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) तसेच, २० विद्यार्थ्यांना बुकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला रोटरी क्लब आॅफ नागपूर विजनचे अध्यक्ष जतिन संपत, माजी अध्यक्ष राजीव बहल, कोषाध्यक्ष अजय उपलेंचीवार, संचालक निलांजन भौमिक, दीपस्तंभ धर्मदायी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौरागडे, सचिव नंदू मानकर, विनोद महाजन आदी उपस्थित होते. यावेळी जतिन संपत आणि राजीव बहल यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणावर भर द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणात कुठेही मागे पडू नये़ यश-अपयश येतच राहील; खचू नये़ रोटरी क्लब आॅफ नागपूर विजन नेहमीच मदतीला आपल्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मान्यवर द्वयांनी दिली. दरम्यान, १० वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ हजारांच्या शिष्यवृत्तीचे वाटप दीपस्तंभ संस्थाच्या माध्यमातून केले जाते. याशिवाय शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येते. समाजातील दानशूर व्यक्ती दीपस्तंभच्या पाठीशी उभे असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन नंदू मानकर केले. राजेंद्र चौरागडे यांनी आभार मानले. संगीता महाजन, भारती चौरागडे, चंदा खंडारे, वैशाली नेवारे, सीमा मानकर, आशिष पानसे यांनी सहकार्य केले.