Home राजधानी मुंबई ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे निधन

76

मुंबई : लेखिका तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला होता.
सुस्पष्ट भूमिका, लोकशाही मूल्यांचे ध्येय जोपासणाºया आणि प्रत्यक्ष कृतीची जोड असणाºया समाजवादी नेत्या अशी पुष्पा भावे यांची ओळख होती. मराठी व संस्कृतमधील पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली होती. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथेही मराठीचे अध्यापन केले. रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या होत्या.
हक्काचा आवाज शांत : उपमुख्यमंत्री
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुष्पाताई भावे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
प्राध्यापक पुष्पाताई भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढ्याची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.