Home उपराजधानी नागपूर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नागपुरात कोविड हॉस्पिटलला भेट

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नागपुरात कोविड हॉस्पिटलला भेट

76

नागपूर : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो हॉस्पिटल येथील कोविड कक्षाला भेट दिली. तसेच, रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयीसुविधांची माहिती घेतली.
रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या व्हीआयपी व साधारण बेड्ची माहिती असलेला डशबोर्ड तसेच संगणकीय यंत्रणेची माहिती जाणून घेतली. रुग्णांची गैरसोय होणार नाही. गरीब व गरजू रुग्ण उपचाराविना वंचित राहू नये याची दक्षता घेऊन रुग्णांना योग्य सेवा मिळाल्या पाहिजेत, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
मेयो हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटल येथील पी.पी. ई. किट, पल्स आॅक्सिमीटर, सिक्स मिनिट वाकींगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच, रुग्णालयातील औषधी विभाग व नवीन बेड्ची पाहणी केली. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सजल मिश्रा व वैद्यकीय अधिकाºयांकडून सुविधांची माहिती जाणून घेतली. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णास पाहता यावे यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकीय सुविधांची माहिती घेतली.