Home उपराजधानी नागपूर आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा : विधानसभा अध्यक्ष

आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करा : विधानसभा अध्यक्ष

361

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात तत्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करा़ यासाठी आपण स्वत:ही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
सप्टेंबरच्या मध्यात मृत्यू दर वाढला होता. आता तो कमी होत आहे. मात्र तरीही ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर का वाढला याचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज वरिष्ठ अधिकाºयांच्या उपस्थितीत घेतला.
हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाºया मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. सोबतच सर्व धर्मदाय रुग्णालयांना कोविड उपचार यंत्रणेमध्ये सक्रिय करण्याचे निर्देश दिले. या काळात चॅरिटी हॉस्पिटलनी नागरिकांसाठी कोरोना उपचाराकरिता स्वत:हून पुढे येण्याची अपेक्षा आहे. यात मागे राहिलेल्या हॉस्पिटलला गतिशील करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला आमदार विकास ठाकरे, आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर,अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गडेकर, अतुल लोंढे व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपूरमध्ये सर्वसामान्य माणसाला आरोग्य यंत्रणेने बाबतची अद्ययावत माहिती नाही, असे होता कामा नये. सामान्यातील सामान्य माणसाला शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडची उपलब्धता सहज माहिती पडेल, अशी यंत्रणा लोकाभिमुख करावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत सामान्यातील सामान्य नागरिकाला लाभ मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here