सर्वेक्षणात ६४१ कोरोनाबाधित रुग्णांची ओळख : जिल्हाधिकारी

(Last Updated On: October 4, 2020)

नागपूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 3 लाख 48 हजार 870 घरांना भेट देऊन सुमारे 14 लाख 21 हजार 113 व्यक्तींचे आरोग्यविषयक तपासणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.
सुमारे1 हजार 994 पथकाद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून यात 641 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे तपासणी अंती सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 70.96 टक्के घरांना भेटी देण्यात आल्या असून 64.63 टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तपासणीसाठी घरी येणाºया आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी तसेच सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या 1 हजार 994 पथकांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरत आहे.
सदर अभियानांतर्गत सारी व संशयित कोरोनाबाधित 767 रुग्ण आढळून आले असून त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली असता 641 रुग्ण बाधीत निघाले. त्यासोबतच 15 हजार 629 व्यक्ती मधुमेह आजाराचे, 2 हजार 675 रुग्ण उच्च रक्तदाब, 219 रुग्ण किडनी, 203 रुग्ण यकृत, तर13 हजार 968 रुग्ण अन्य आजाराने बाधित असल्याचे आढळून आले आहे. तपासणीमध्ये आढळून आलेल्या 32 हजार 491 रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित आरोग्य अधिकाºयांना कळवण्यात आले आहे.
मोहिमेंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांच्या तपासणीमध्ये कळमेश्वर तालुक्यात 95.74 टक्के, रामटके 90.15 टक्के, उमरेड 93.24 टक्के, भिवापूर 71.33 टक्के, कुही 75.77 टक्के, मौदा 79.23 टक्के, नरखेड 88.70 टक्के, सावनेर 63.86 टक्के, हिंगणा 63.98 टक्के, पारशिवनी 53 टक्के, कामठी 48 टक्के, काटोल 47.46 टक्के, नागपूर ग्रामीण 16 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या आशांमध्ये नरखेड तालुक्यात 114, कुही 102, कळमेश्वर 99, नागपूर ग्रामीण 165, मौदा 123, भिवापूर 99, रामटेक 172, उमरेड 122, कामठी 124, काटोल 112, पारशिवनी 152, हिंगणा 164 तर सावनेर तालुक्यात 169 आशांव्दारे ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *