पायाभूत सुविधांचा विकास पूर्ण ताकदीने : पंतप्रधान

राष्ट्रीय

नवी दिल्ली : देशाच्या सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास सरकारकडून पूर्ण ताकदीने होत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते शनिवारी हिमाचल प्रदेशात रोहतांग येथे अटल बोगद्याचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, संयुक्त संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आदींची उपस्थिती होती.
जगातील सर्वात लांब अशा महामार्ग बोगद्याची निर्मिती सीमा रस्ते संस्था अर्थात बीआरओने केले आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधील अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले असून ९.२ किलोमीटर लांबीच्या अटल बोगद्यामुळे ५ ते ६ तासांचा प्रवास वाचणार आहे. या भागात जास्त बर्फवृष्टी होत असल्याने सुमारे सहा महिने बंद असणारा मनाली लाहौल-स्पिटी व्हॅली हा मार्ग आता वर्षभर खुला राहणार आहे.
दरम्यान, दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ रोहतांग बोगद्याचे नामकरण अटल बोगदा करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *