Home प्रादेशिक विदर्भ दिवाळीनंतर इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होणार

दिवाळीनंतर इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होणार

25

अमरावती : राज्यातील इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम-अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. आता सहा महिन्यांच्या कालावधीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त शिक्षण विभागाकडून काढला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने संपवण्यात येत आहे. राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उद्योग, वाहतूक यासारख्या गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, चित्रपट-नाट्यगृहे, मंदिरे आणि शाळा महाविद्यालये अजूनही बंद आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष आॅनलाईनच सुरू करण्यात आले असले तरी विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here