Home प्रादेशिक राज्य शासनाचा सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव

राज्य शासनाचा सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव

62

सातारा : यावर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी भाव देणार असून येत्या 15 आॅक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला हा पाऊस आताही सुरू आहे. राज्यातील सोयाबीनचे पिक काढणे व मळणी काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा यासाठी खासगी व्यापाºयांकडे जात आहेत. मात्र, राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावरच आपला माल विकावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
राज्यात अजूनही पाऊस पडत असल्याने सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी काढलेल्या सोयाबीन विक्रीची घाई करता कामा नये. सोयाबीनला राज्य शासनाने 3 हजार 880 रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून 15 आॅक्टोबरपासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणीनंतरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here