Home राष्ट्रीय आगामी जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना लस

आगामी जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना लस

69

नवी दिल्ली : सरकारने सुमारे ४०-५० कोटी कोविड-१९ व्हॅक्सिन तयार करण्याची योजना आखली आहे. तसेच, जुलै २०२१ पर्यंत २० ते २५ कोटी लोकांपर्यंत व्हॅक्सिन पोहोचवण्याचे निश्चित केले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
कोरोना महामारीविरोधात जगभरात लस शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक देशातील लस तिसºया टप्प्यात असल्याचा दावा केला जात आहे. अशातच डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हॅक्सिनबद्दल माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, कोविड-19 कोरोना लशीचे प्राधान्य आरोग्य कर्मचाºयांसाठी असणार आहे. त्याची खरेदी केंद्र सरकार करणार असून प्रत्येक व्हॅक्सिन ट्रॅक केले जाणार आहे. भारतीय लस निर्मात्यांवर पूर्ण सरकारी मदत दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.