Home राजधानी मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराचे आरोग्य सर्व्हेक्षण

331

मुंबई : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून मंगळवारी सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.
यात सर्वांची आॅक्सिजन पातळी, तापमान तपासण्यात आली़ तसेच, आरोग्यविषयक माहिती भरून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पथकाशी चर्चा करून मोहिमेची अंमलबजावणीविषयी माहिती घेऊन उपयुक्त सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here