महाराष्ट्र राज्याला आठ सीएनजी स्टेशन

(Last Updated On: October 6, 2020)

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभर ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसचे ३ सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. यापैकी आठ महाराष्ट्र राज्यात आहेत.
मंत्री प्रधान यांनी एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ४२ सीएनजी आणि तीन सिटी गेट स्टेशन्स जोडली. या कार्यक्रमात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील सीएनजी आणि सिटी गॅस स्टेशन प्राप्त झालेले वितरक उपस्थित होते. जोडलेल्या ४२ सीएनजी स्टेशन्समध्ये १४ उत्तरप्रदेश, ८ महाराष्ट्र, ६ गुजरात, ४ पंजाब आणि ५-५ तेलंगाणा आणि राजस्थान येथे आहेत. सात राज्य, १ केंद्रशासित प्रदेशातील एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क पसरवण्याचे अधिकार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये एक-एक सिटी स्टेशन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *