गृह अलगीकरण रुग्णांना अचूक आरोग्य सल्ला मिळावा : डॉ. राऊत

उपराजधानी नागपूर

नागपूर : नागपूर शहरातील गेल्या महिनाभरापूर्वीच्या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने एकजुटीने समाधानकारक नियंत्रण आणले आहे. खाटांची, औषधांची व आॅक्सिजनची मुबलक उपलब्धता आहे. तथापि, मृत्यूदर कमी करण्यासोबतच गृह अलगीकरणातील (होम आयसोलेशन) रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा, असे निर्देश, ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
डॉ. नितीन राऊत यांनी पालक सचिव असीम गुप्ता यांच्यासह मुंबई येथून आज कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी झाले होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गेल्या महिन्याभरात खाटांची उपलब्धता, आॅक्सिजनच्या नियमित पुरवठ्याची यंत्रणा, मुबलक औषधी जिल्ह्यात असून आता डॉक्टरांची काही प्रमाणात कमतरता जाणवत असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य यंत्रणेत केलेली सुधारणा, सामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेल्या नव्या उपाययोजना, ग्रामीण भागात वाढवलेल्या चाचण्या, माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम, आशा अंगणवाडी सेविका व अन्य क्षेत्रांतून होणारी मदत याबाबतची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील खाजगी रुग्णालयांचा वाढलेला सहभाग, लोकांच्या घरापर्यंत जात चाचणीचा उपक्रम, वाढवलली चाचणीची संख्या, डॅशबोर्डवर माहितीची उपलब्धता, सर्वसामान्य नागरिकांसाठी २४ तास सुरू करण्यात आलेल्या वॉररूमची माहिती दिली.
पालक सचिव असीम गुप्ता यांनी सामान्य नागरिकांना बेडच्या उपलब्धतेबाबत व चाचणी केंद्रांसंदर्भातील माहिती घरबसल्या मिळावी, यासाठी अ‍ॅप विकसित करण्याची सूचना केली. नागपूर शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता घरामध्ये वैद्यकीय उपचार करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना योग्य ती वैद्यकीय माहिती, घरापर्यंत चाचणीची सोय, शासकीय रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *